महा ई सेवा केंद्र,भरणे

(महाराष्ट्र व भारत सरकारचा उपक्रम )सार्वजनिक –ई- नागरी सुविधा केंद्र

सौ.प्रिया पराग रेडेकर (संचालिका)

मोरे बिल्डिंग , तटकरे कॉम्प्लेक्स जवळ , मुंबई -गोवा हायवे, भरणे ता.खेड

मोबाईल :९८६०६६०६४२


Friday, 4 October 2013

G2C व B2C सेवा


पॅन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे :
  • २ पासपोर्ट साईज फोटो
  • रेशनकार्ड झेरॉक्स            
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड (उपलब्ध असल्यास)
  • ओळखपत्र - मतदान कार्ड/ आधार कार्ड/कॉलेज आयडी/ ड्रायव्हिंग लायसन्स इ. (उपलब्ध असल्यास)   

दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

वरील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केल्यास दाखले मिळविणे अधिक सुलभ होईल. तसेच अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे. स्व घोषणापत्रासाठी अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. स्व घोषणापत्राचा नमुना व विहित नमुन्यातील अर्ज आमच्या महा ई सेवा केंद्रावर उपलब्ध आहेत.

वीज बिल भरणा केंद्र

एम्प्लॉयमेंट कार्ड सुविधा


आवश्यक कागदपत्रे :
  • शैक्षणिक पात्रता असलेल्या प्रमाणपत्रांची सत्यप्रत 
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय असल्यास) 
  • डोमिसाईल                   
  • २ पासपोर्ट साईज फोटो          
  • शाळा सो.दाखला/बोनाफाईड

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांना विविध सरकारी कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. यात त्यांची होणारी गैरसोय तसेच वेळ आणि पैशांचा अपव्यय लक्षात घेऊन जिल्ह्यात  सर्व कामे तातडीने करण्यासाठी व नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा जलद व कमी पैशात  एकाच ठिकाणी  योग्य प्रकारे करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
    ग्रामीण भागातील जनतेला सात-बारा उतारा, जातीचा दाखला, जमिनीसंदर्भातील दाखले, रहिवासी दाखला यांसह विविध प्रकारच्या सरकारी कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात यावे लागते. मात्र येथे वारंवार येऊनही नागरिकांना आवश्यक ते प्रमाणपत्र योग्य त्या वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होतो. यातून अनेकांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. या सर्व परिस्थितीची दखल घेत जिल्ह्यात  शासनाने आमची या कामासाठी निवड केली आहे.